दि नवनिर्माण को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 5, 2018 दि नवनिर्माण को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु भारतीय बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47अ(1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, दि नवनिर्माण को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना, ‘एक्सपोझर नॉर्म्स आणि वैधानिक/इतर निर्बंध युसीबीज’ ह्यावर रिझर्व बँकेने दिलेले निर्देश/सूचना/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले असल्याने रु.50,000/- (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे. भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाल्याचे सिध्द होत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/798 |
पेज अंतिम अपडेट तारीख: