बंधन बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु
ऑक्टोबर 29, 2019 बंधन बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक दंड लागु भारतीय रिझर्व्ह बँकेने, (आरबीआय) आदेश दि. ऑक्टोबर 29, 2019 अन्वये, बंधन बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रुपये एक कोटी दंड लागु केला असून, तो दंड, वरील बँकेला बँकिंग परवाना देतेवेळी, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (हा अधिनियम) कलम 22 खाली दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने जारी केलेल्या अटींसह वाचित, फेब्रुवारी 22, 2013 रोजीच्या “खाजगी क्षेत्रातील नवीन बँकांना परवाना देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे” (परवाना देण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे) मधील, प्रायोजकांचे धारण ह्यावरील मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. परवाना देण्याबाबतची वरील मार्गदर्शक तत्वे व अटी ह्यांचे अनुपालन वरील बँकेने न केल्याचे विचारात घेऊन, ह्या अधिनियमाच्या कलम 46 (4)(आय) सह वाचित, कलम 47 अ (1)(क) खाली आरबीआयला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे. ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करारांच्या वैधतेशी संबंधित नाही. पार्श्वभूमी वर दिलेल्या परवान्याच्या अटींसह वाचित परवान्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, वरील बँकेने, तिचा व्यवसाय सुरु झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत, त्या बँकेतील/तिच्या अकार्यकारी वित्तीय धारक कंपनीमधील समभाग धारण, तिच्या एकूण भरणा झालेल्या इक्विटी भांडवलाच्या 40% पेक्षा अधिक भांडवल, 40% आणणे आवश्यक होते. तथापि, वरील बँकेने वरील परवाना-मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नसल्याने, त्या बँकेला एक नोटिस (एससीएन) पाठविण्यात आली होती आणि वरील परवाना मार्गदर्शक तत्वांचे अनुपालन न करण्याबद्दल तिला दंड का लावला जाऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. ह्यावर त्या बँकेकडून मिळालेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीत तिने केलेली सादरीकरणे, आणि तिने सादर केलेली कागदपत्रे विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, आरबीआयने जारी केलेल्या, परवाना - अटींसह वाचित, परवाना मार्गदर्शक तत्वांचे पालन वरील मार्गदर्शक तत्वांचे पालन वरील बँकेने केलेले नाही आणि वरील बँकेवर आर्थिक दंड लावण्याचे ठरविण्यात आले. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/1051 |
पेज अंतिम अपडेट तारीख: