करुर वैश्य बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
सप्टेंबर 28, 2018 करुर वैश्य बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु सप्टेंबर 25, 2018 रोजीच्या एका आदेशान्वये, भारतीय रिझर्व बँकेने, करुर वैश्य बँक लि. (ती बँक) ह्यांना रु.5 कोटी दंड लागु केला असून तो दंड, त्या बँकेने, उत्पन्न ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) नॉर्म्स, फसवणुकी कळविणे आणि चालु खाते उघडतेवेळी असलेली शिस्तीची आवश्यकता ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केले गेल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने वर दिलेल्या सूचनांचे वरील बँकेने अनुपालन न केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सहवाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे. ही कारवाई विनियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांच्या किंवा करारांच्या वैधतेबाबत नाही. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/743 |
पेज अंतिम अपडेट तारीख: