भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लोकपाल योजना 2006 चा वार्षिक अहवाल वितरित
एप्रिल 24, 2019 भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लोकपाल योजना 2006 चा वार्षिक अहवाल वितरित भारतीय रिझर्व्ह बँकेने आज, 2017-18 सालासाठीचा, बँकिंग लोकपाल योजनेसाठीचा वार्षिक अहवाल वितरित केला आहे. ठळक बाबी
(2) बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 35 अ खाली, जून 14, 1995 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग लोकपाल योजना अधिसूचित करण्यात आली. ह्या योजनेचे ध्येय व उद्दिष्ट म्हणजे, कोर्टकचे-यासारख्या तक्रार निवारण संस्थांकडे जाणे कठीण व खर्चिक असलेल्या सर्वसामान्य बँक ग्राहकांच्या, बँकिंग सेवांमधील त्रुटींबाबतच्या तक्रारींचे निःशुल्क व जलद निराकरण करणारी यंत्रणा उपलब्ध करुन देणे. ही योजना, अनुसूचित वाणिज्य बँका, अनुसूचित प्राथमिक अर्बन कोऑपरेटिव बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांना लागु आहे. ही योजना सुरु केल्यानंतर त्यात अनेक सुधारणा/बदल केले गेले. सध्या, जुलै 1, 2017 पर्यंत सुधारित करण्यात आलेली बँकिंग लोकपाल योजना 2006 कार्यवाहीत आहे. सर्व राज्ये व केंद्र शासित प्रदेशांचा समावेश असलेले व राज्य-निहाय अधिकार क्षेत्र असलेले 21 बँकिंग लोकपाल आहेत. अजित प्रसाद वृत्तपत्र निवेदन : 2018-2019/2527 |
पेज अंतिम अपडेट तारीख: