RbiSearchHeader

Press escape key to go back

Past Searches

rbi.page.title.1
rbi.page.title.2

Notification Marquee

RBI Announcements
RBI Announcements

RbiAnnouncementWeb

RBI Announcements
RBI Announcements

Asset Publisher

78529455
आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना

आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना

नोव्हेंबर 12, 2021

आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना

भारतीय रिझर्व्ह बँक आजपासून, आरबीआय रिटेल डायरेक्ट योजना सुरु करण्यात आल्याचे घोषित करत आहे. ही योजना भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी आज आभासी (र्व्हच्युअल) रितीने सुरु केली.

सरकारी सिक्युरिटीज् (जी-सेक) मार्केटच्या विकासातील एक लक्षणीय मैलाचा दगड म्हणून, भारतीय रिझर्व्ह बँक - रिटेल डायरेक्ट (आरबीआय-आरडी) मुळे, गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी होऊन, जी-सेक्स सामान्य माणसाच्या आवाक्यात सहजपणे येतील. ह्या योजनेखाली, फुटकळ वैय्यक्तिक निवेशक, एका ऑनलाईन पोर्टलचा (https://rbiretaildirect.org.in) वापर करुन, भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक रिटेल डायरेक्ट गिल्ट (आरडीजी) खाते उघडू शकतील. पुढील मार्ग वापरुन गुंतवणुकी करता येतील -

(अ) सरकारी सिक्युरिटीजचे प्राथमिक प्रदान (प्रायमरी इश्यु अन्स) :- सरकारी सिक्युरिटीजच्या प्राथमिक लिलावात भाग घेण्यासाठीच्या अ-स्पर्धात्मक योजनेनुसार व एसजीपी देण्याच्या रीतसर मार्गदर्शक तत्वांनुसार निवेशक त्यांची बोली (बिड) देऊ शकतात.

(ब) दुय्यम बाजार (सेकंडरी मार्केट) :- निवेशक, एनडीएसओएम वर (‘ऑड लॉट’ व ‘रिक्वेस्ट फॉर कोट्स’ विभाग) सरकारी सिक्युरिटीजची खरेदी व विक्री करु शकतात.

व्यवहारांसाठीची प्रदाने, सोयीनुसार, बचत बँक खाते वापरुन, इंटरनेट बँकिंग द्वारा किंवा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) द्वारा केली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, निवेशक, मदत व इतर सहाय्यक सुविधा त्या पोर्टलवरच मिळवू शकतात किंवा 1800–267-7955 ह्या निःशुल्क क्रमांकामार्फत (सकाळी 10 ते संध्याकाळी 7) मार्फत व ई-मेलने मिळवू शकतात. निवेशक सेवांमध्ये, व्यवहारांसाठी तरतुद व शिल्लकेबाबतची विवरणपत्रे, नामनिर्देशन सुविधा, सिक्युरिटीजचे लिएन किंवा प्लिजिंग व देणगी व्यवहार समाविष्ट आहेत. ह्या योजनेखाली दिल्या जाणा-या सुविधांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

निवेशकांना एक सुरक्षित, सुलभ, थेट व संरक्षित मंच उपलब्ध करुन देणे हे ह्या योजनेचे उद्दिष्ट आहे.

(योगेश दयाल)   
मुख्य महाव्यवस्थापक

प्रेस प्रकाशनी : 2021-2022/1183

RbiTtsCommonUtility

प्ले हो रहा है
ऐका

Related Assets

RBI-Install-RBI-Content-Global

RbiSocialMediaUtility

भारतीय रिझर्व्ह बँक मोबाईल ॲप्लिकेशन इंस्टॉल करा आणि नवीनतम बातम्यांचा त्वरित ॲक्सेस मिळवा!

Scan Your QR code to Install our app

RbiWasItHelpfulUtility

पेज अंतिम अपडेट तारीख:

हे पेज उपयुक्त होते का?